'अजितदादा पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांनी घरी घेतलं नसतं तर...'; निलेश राणेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 01:11 PM2021-06-07T13:11:35+5:302021-06-07T13:12:01+5:30
भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती?, अशी जळजळीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना अजित पवार यांनी लक्ष्य केलं होतं. यावरुन निलेश राणे यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. "अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा", असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2021
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर अजित पवार टीका केली होती. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार म्हणाले होते.