शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस

By मोरेश्वर येरम | Published: January 18, 2021 5:09 PM

भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यासोबत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका यावेळी केली. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

"राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. लॉकडाउनकाळात केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी उभं राहिलं. तर राज्य सरकारने कुणालाही मदत केली नाही. यामुळे लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आता विश्वास उरलेला नाही", असं फडणवीस म्हणाले.  

शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही"राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

कोकणात अभूतपूर्व यशग्राम पंचायत निवडणूक निकाल कोकणात भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचाही फडणवीस यांनी आवर्जुन उल्लेख केला. "राणे यांच्यामुळे कोकणात आज भाजपला मोठं यश मिळालं आहे. तिथं स्थानिक पातळीवर शिवसेनेविरोधात रोष निर्माण झाला आहे. गावाचा विकास कोण करेल हे पाहून लोकांनी मतदान केलं आहे", असं फडणवीस म्हणाले. 

नामांतरावर केवळ 'टाइमपास'औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुनही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. "औरंगाबादचं नामांतर करण्याची खरंतर या सरकारची इच्छाच नाहीय. शिवसेना आणि काँग्रेस केवळ पत्राचा खेळ खेळत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ आपल्या मतदारांना खूष करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नामांतरावरुन हे सरकार केवळ टाइमपास करत आहे", असं फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपा