BJP Candidate List: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ६६ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाने हेमंत सोरेन यांची साथ सोडून आलेले माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेला विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्याचबरोबर बाबूलाल मरांडी यांना धनवार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने जामताडा मतदारसंघातून सीता सोरेन, कोडरमा मतदारसंघातून, नीरा यादव, गांडेय मतदारसंघातून मुनिया देवी, सिंदरी मतदारसंघातून तारा देवी, निरसामधून अपर्णा सेनगुप्ता, झरियातून रागिणी सिंह, चाईबासामधून गीता बलमुचू, छतरपूरमधून पुष्णा देवी भुईया यांना उमेदवारी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री बाबूलाल सोरेन यांनाही उमेदवारी
भाजपाने महगामा विधानसभा मतदारसंघातून अशोक कुमार भगत यांना, बरकठ्ठ विधानसभा मतदारसंघातून कुमार यादव, बरही विधानसभा मतदारसंघातून मनोज यादव, बरकागाव विधानसभा मतदारसंघातून रोशनलाल चौधरी, हजारीबाग विधानसभा मतदारसंघातून प्रदीप प्रसाद, सीमरिया विधानसभा मतदारसंघातून उज्ज्वल दास, बगोदर विधानसभा मतदारसंघातून नागेंद्र महतो, जमुआ विधानसभा मतदारसंघातून मंजू देवी, गिरीडीह विधानसभा मतदारसंघातून निर्भय कुमार शाहबादी, बरमो विधानसभा मतदारसंघातून रवीद्र पांडे, बोकारे विधानसभा मतदारसंघातून बिरंची नारायण, चंदनकियारी विधानसभा मतदारसंघातून अमर कुमार बाऊसी, धनबाद विधानसभा मतदारसंघातून राज सिन्हा, झरिया विधानसभा मतदारसंघातून रागिणी सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
बाघमारा विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न महतो, बहरागोडा विधानसभा मतदारसंघातून दिनेशानंद गोस्वामी, घाटशिला विधानसभा मतदारसंघातून बाबूलाल सोरेन, पोटका विधानसभा मतदारसंघातून मीरा मुंडा, जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून पूर्णिमा दास साहू यांना तिकीट दिले आहे.
झारखंडमध्ये १३ ऑक्टोबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. झारखंड विधानसभेचा निकाल महाराष्ट्राबरोबरच म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान होणार आहे.
झारखंडमध्ये ८१ जागांसाठी निवडणूक होत असून, बहुमताचा आकडा ४२ आहे. २०१९ मध्ये ३० जागा जिंकत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष ठरला होता.