केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केरळमध्ये राहुल गांधी यांच्याद्वारे नाव न घेता अमेठीवर केलेल्या एका वक्तव्यावरून स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. "१५ वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणं नवं होतं. कारण मला वाटलं इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार निशाणा साधला. स्मृती इराणी यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ते कृतघ्न असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीराम यांचं जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. तोडण्याचं राजकारण हे तुमचे संस्कार आहे. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही संपूर्ण देशाला मातेसमान मानतो," असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 8:32 AM
Rahul Gandhi : राहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणा
ठळक मुद्देराहुल गांधी हे कृतघ्न असल्याचं म्हणत स्मृती इराणी यांनी साधला जोरदार निशाणाकाँग्रेसचं राजकारण विभाजन करणारं असल्याचं योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य