मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी प्रदेश भाजपने समर्थ बूथ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी समर्पित करण्यात येणार आहे.पाच बूथमागे एक शक्ती केंद्र प्रमुख नेमण्यात येत आहेत. स्थानिक सामाजिक समीकरणानुसार नावे निश्चित केली जातात. प्रत्येक बूथवर भाजपचे प्रमुख पदाधिकारी बैठक घेतात आणि तेथे मतदार यादीचे वाचन केले जाते. त्याची माहिती प्रदेश भाजप कार्यालयास पाठवावी लागते. प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयात या संपूर्ण अभियानासाठी वॉर रूम असून तेथे ३५ जणांची टीम काम करीत आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी दिली.‘आमच्या गाडीला यापुढे एकच इंजिन राहील’, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध मनसेला सोबत घेण्याशी जोडला गेला. प्रत्यक्षात भाजपने पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची मदत मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे महापालिकेत घेतली जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.२५ लाख युवा वॉरिअर्स१८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांनी ‘युवा वॉरिअर’ अशी पाटी हातात घेऊन सेल्फी काढायचा आणि त्यासह नोंदणी करण्याचे अभियान सध्या सुरू आहे. २५ लाख युवा वॉरिअर नोंदण्याचे उद्दिष्ट आहे.२०१९मध्ये सर्वाधिक मते२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रितपणे लढले होते. भाजपला राज्यात सर्वाधिक २५.७५ टक्के मते मिळाली होती व १०५ आमदार निवडून आले होते. शिवसेनेला १६.४१ टक्के इतके मतदान झाले होते आणि ५६ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला १६.७१ टक्के मते आणि ५४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने १५.८७ टक्के मतांसह ४४ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होती. अर्थात, चारही प्रमुख पक्ष युती आघाडी करून लढल्याने प्रत्येकाची स्वतंत्र मतशक्ती किती हे समोर येऊ शकले नव्हते.मुंबई पालिकेतील मतेमुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत शिवसेना-भाजप राज्यात सत्तेत एकत्र असूनही वेगवेगळे लढले होते. शिवसेनेला ८४ जागा आणि १४,४३,९६९ मते मिळाली होती. भाजपला ८२ जागा आणि १३,९२,६७६ मते मिळाली होती.
महाविकास आघाडीला भिडण्यासाठी भाजपची रणनीती; 'समर्थ बूथ अभियान' घेणार हाती; 'असा' असणार प्लान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 8:28 AM