शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

मनसेत 'इनकमिंग'चा धडाका सुरूच, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर 'पक्षप्रवेश'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:06 PM

Teacher Volunteers join MNS : नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

ठळक मुद्देकालच ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनते इतर पक्षाच्या नेत्यांची इनकमिंग सुरु आहे. गुरुवारी नाशकातील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. नाशिकमधीलमनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. (Teacher Volunteers join MNS at Raj Thackeray residence Krishnakunj)

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोठी तयारी सुरु केली आहे. कालच ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.

नाशिकमधील शिक्षकांच्या एका समुदायाने मनसेत प्रवेश केला. आधी हे शिक्षक भाजपासाठी कार्यरत होते. तसेच, येवल्याच्या मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारीही आज मनसेत दाखल झाले. दरम्यान, आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त मनसेचे नगरसेवक निवडून आणू आणि राज ठाकरे यांचा नाशिकमध्ये झंझावात सुरु होईल,अशी प्रतिक्रिया अशोक मुर्तडक यांनी यावेळी दिली.

भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेशबुधवारी ठाणे आणि वसई विरारमधील शेकडो भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थकांचा आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

"मनसेसोबत युती होऊ शकते, पण…"कोणी आपला पक्ष कसा वाढवायचा, याचे स्वातंत्र्य आपल्या लोकशाहीत आहे. मनसेमध्ये अमराठी सहभागी होत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. मनसेच्या देशभक्ती आणि हिंदुत्वाबद्दल शंका नाही. त्यामुळे मनसेसोबतच्या युतीबाबत तुम्ही विचारत असाल, तर मनसेसोबत युती होऊ शकते, पण त्यांनी अन्य प्रांतियांबद्दलची भूमिका बदलली पाहिजे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईNashikनाशिकTeacherशिक्षक