कोल्हापूर : सांगली-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली अशा भाजपच्या नगरसेवकांना रविवारी किंवा सोमवारी नोटीसा दिल्या जातील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कॉग्रेस - राष्ट्रवादीने या निवडणुकीत घोडेबाजार केला, असा आरोप पाटील यांनी पुन्हा एकदा केला.या निवडणुकीत भाजप नगरसेवकात नाराजी होती याकडे लक्ष वेधले असता पाटील, म्हणाले, निवडणुकीच्या आधी दोन दिवस मी सांगलीला गेलो होतो. सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
जे फुटले त्यातील काही जण महापौर-उपमहापौरपदाचे अर्ज भरायलाही होते. या प्रकरणाची पक्षीय पातळीवर चौकशी झाली आहे. त्यांना रविवारी किंवा सोमवारी नोटीस लागू केल्या जातील. जे गेले त्यांच्यावर कारवाई होईल, असे पाटील म्हणाले.