कोलकाताः लोकसभा निवडणूक 2019 यंदा पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाचं पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मोदी-शाहांच्या या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळतानाही पाहायला मिळतंय. आज तक आणि एक्सिस माय इंडियानं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 19 ते 23 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 19 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसची फक्त एक जागा निवडून येण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये यंदा कम्युनिस्टांना खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. तर तृणमूल काँग्रेसलाही 19च्या जवळपास जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओडिशामध्येही जबरदस्त उलथापालथी होण्याची शक्यता आहे. इथे बऱ्याच वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीजेडीला मोठा फटका बसणार आहे. एक्झिट पोलनुसार, ओडिशामध्ये लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत. त्यातील भाजपाला 15 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज असून, बीजेडीला 2 ते 6 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
Lok Sabha 2019 Exit Poll: ममतांच्या गडाला भाजपा लावणार सुरुंग, 'एवढ्या' जागा जिंकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 22:49 IST