"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:17 PM2024-10-08T19:17:51+5:302024-10-08T19:17:51+5:30
PM Modi First Reaction on Haryana Vidhan Sabha election Results 2024: हरयाणामध्ये भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची कामगिरी केली. भाजपासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया काय आहे?
PM Modi on Haryana Election Results 2024: एक्झिट पोल आणि राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकीचे ठरवत भाजपानेहरयाणात चांगली कामगिरी केली. विरोध वातावरण असल्याचा सूर लावला जात होता, पण भाजपाने सगळ्या आव्हानांचा सामान करत हरयाणामध्ये विजयाची हॅटट्रिक केली. लोकसभा निवडणुकीनंतर या निकालाने पक्षात उत्साहाचे वातावरण असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल जनतेचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदी हरयाणाच्या जनतेला काय म्हणाले?
हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट केली आहे.
"हरयाणाचे मनापासून आभार! भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल मी हरयाणाच्या जनशक्तीला नमन करतो. हा विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा विजय आहे. मी येथील लोकांच्या ग्वाही देतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही", अशा भावना मोदींनी हरयाणाच्या जनतेप्रती व्यक्त केल्या.
भाजपाच्या ऐतिहासिक विजयाचे मोदींनी काय सांगितले कारण?
पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटलं आहे की, "या महाविजयासाठी प्रचंड कष्ट आणि समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्या सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन! तुम्ही फक्त राज्यातील जनता-जनार्दनाची भरपूर सेवाच केली नाही, तर विकासाचा आपला अजेंडा (कार्यक्रम) त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. याचाच परिणाम म्हणजे भाजपाचा हरयाणात हा ऐतिहासिक विजय झाला आहे."
हरियाणा का हृदय से आभार!
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024
भारतीय जनता पार्टी को एक बार फिर स्पष्ट बहुमत देने के लिए मैं हरियाणा की जनशक्ति को नमन करता हूं। यह विकास और सुशासन की राजनीति की जीत है। मैं यहां के लोगों को विश्वास दिलाता हूं कि उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ेंगे।
कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?
हरयाणामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. ४० जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यांतर दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाच्या पाठिंब्यावर हरयाणात सरकार स्थापन केले होते.
2019 च्या तुलनेत यावेळी भाजपाची कामगिरी चांगली राहिली आहे. भाजपाने 48 जागा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये काँग्रेसने 31 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसची कामगिरी सुधारली असली, तरी सत्ता मिळवण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळवता आला. आयएनएलडी पक्षाला दोन, तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.