बदायूं : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पक्षाला ‘अली’चेच काय, नाहीच, ‘बजरंग बली’चेही मत मिळणार नाही. या निवडणुकीत ‘नमो नमो’ असा जप करणारे जाणार आणि ‘जय भीम’चा जयघोष करणारे सत्तेत येणार. आमची या देशाला सध्या खूप गरज आहे, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी शनिवारी येथील जाहीर सभेत सांगितले.महाआघाडीचे उमेदवार, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्या प्रचारार्थ बदायूं येथे सभा झाली. त्या म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश मधून योगी यांच्या पक्षाला ‘अली’ चे मत मिळणार नाही, आणि माझ्या जातीशी संबंधित असलेल्या बजरंग बलीचेही मतदान होणार नाही.निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी जनतेसमोर ठेवणार असल्याचे सांगत मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्तव्याबद्दल निशाणा साधला. ‘त्यांचे अली असतील, तर आमचे बजरंग बली आहेत’ असे योगी म्हणाले होते. मायावती म्हणाल्या, ‘त्यांना मी उत्तर देऊ इच्छिते. आमचे ‘अली’सुद्धा आहेत व ‘बजरंग बली’सुद्धा आहेत. आमच्यासाठी दोघेही आमचे आपले आहेत. आम्हाला कोणीही परके नाही, आम्हाला ‘अली’ही हवेत आणि ‘बजरंग बली’ही हवेत.
‘अली’च्याच काय, ‘बजरंग बली’च्याही मतांचा भाजप हक्कदार नाही; मायावती यांचा टोला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:39 IST