Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याने भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाने आज विधानसभा सभागृहात न जाता पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा भरविली आहे. (Bjp call Prati Vidhan sabha against 12 mla Suspension.)
Sanjay Raut: ...नाहीतर सभागृहात दंगली होतील; 12 आमदारांवरून संजय राऊतांची भाजपावर तुफान टोलेबाजी
या प्रतिविधानसभेचे कालीदास कोळंबकर अध्यक्ष आहेत. दुसरीकडे विधानसभेत कामकाज सुरु आहे.या महाराष्ट्रात सरकारकडून अन्याय सुरु आहे. शेतकरी, विद्यार्थी, एमपीएससीचे प्रश्न असतील या प्रश्नांवर आवाज उठविला तर अध्यक्ष महोदय खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केले जात आहे. खूर्चीवर बसून जे घडलेच नाही ते आरोप केले जात आहे. यामुळे मी आज या प्रतिसभागृहात मी प्रस्ताव मांडत आहे. यावर चर्चा सुरु करावी, आणि सरकारचा जो काही कारभार सुरु आहे, त्या जुलमी सरकार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे. ज्या सदस्यांनी तुम्हाला नावे दिली आहेत, त्या सदस्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रति विधानसभेचे अध्यक्ष कोळंबकर यांच्याकडे केली.
या प्रस्तावाला अध्यक्षांनी त्वरित संमती देत विखे पाटलांना पहिले बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष महोदय आमचे म्हणणे मांडताना मध्येच आम्हाला थांबवू नका, बेल वाजवू नका, असा टोला विखे पाटलांनी लगावला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला.