मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या Kangana Ranaut अनाधिकृत कार्यालयावर महापालिकेने २४ तासाच्या आत कारवाई केली त्यानंतर विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. कंगनाचं कार्यालयावर कारवाई करताय, बीएमसीचा कायदा सगळ्यांसाठी सारखाचं आहे. पुढची कारवाई शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर करणार का असा सवाल भाजपा आमदार नितेश राणेंनी विचारला आहे.
याबाबत नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, बीएमसीकडून आज जी कारवाई केली जात आहे ती सगळ्यांसाठी समान असेल. कायद्यासमोर कोणीही मोठे नाही. यापुढे बीएमसीने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर कारवाई करणार का? तर ते नाही, कारण इतकी हिंमत ते कसं करणार...सबका टाईम आयेगा म्हणत त्यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
तर बीएमसीने नियम डावलून अशाप्रकारे कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. एखाद्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करताना एक प्रक्रिया असते ती पूर्ण न करता पालिकेने सुडबुद्धीने ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या बांधकाम इमारत विभागाकडे आलेल्या अनाधिकृत बांधकामांची यादी घ्यावी. महापालिकेने त्याही बांधकामावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.
महापालिकेच्या तोडक कारवाईला पाकिस्तान कॅप्शन; कंगनानं शिवसेनेला दिली बाबराची उपमा
कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'हे बाबरचं सैन्य', कंगनाचा शिवसेनेवर बाण; ऑफिसचं तोडकाम पाहून म्हणाली 'पाकिस्तान'
कंगनाच्या कार्यालयात नेमकं काय अनधिकृत?
तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.
“बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?”
महापालिकेने बजावली होती नोटीस
कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.