ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.
तरुण गोगोई हे आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २००१ पासून तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.
शीला दीक्षित १९९८ सालापासून तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित ह्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव केला.
पवनकुमार चामलिंग हे सिक्किम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असलेले चामलिंग मुख्यमंत्रीपदावर १९९४ सालापासून आहेत.
ओक्राम इबोबी सिंग हे मणिपूर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले आहेत.
नवीन पटनायक हे ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व माजी केंद्रीय खाणमंत्री आहेत. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत. २००० पासून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
माणिक सरकार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी आहेत. १९९८ सालापासुन त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७ २००१ पासून मे २२ २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते
भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.