बोलपूर: देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीच्या पुढे गेला आहे. दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात येताना दिसत आहे. सध्याच्या घडीला देशभरात लसीकरणाची तयारी सुरू आहे. जवळपास २६० जिल्ह्यांमध्ये २० हजार कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे. गेल्या ९ महिन्यांपासून देशावर कोरोनाचं संकट असल्यानं मोदी सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी कायद्यांची अंमलबजावणी थांबली आहे.बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडायलाही भाजपला संघर्ष करावा लागेल; निवडणूक रणनीतीकाराचा दावाकोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्यावर (सीएए) काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली. अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दरम्यान शहांनी मोदी सरकारच्या आगामी लक्ष्यांची माहिती दिली. 'कोरोनामुळे अनेक कामं थांबली आहेत. सीएएचे नियम तयार करण्याचं काम बाकी आहे. कोरोनाची साखळी खंडित झाल्यावर आणि लसीकरण सुरू झाल्यावर यावर विचार सुरू केला जाईल,' अशी माहिती शहांनी दिली.भाजपच्या गोटात ममता बॅनर्जींचा सर्जिकल स्ट्राईक; खासदाराची पत्नी तृणमूलमध्येकोरोना संकटात नियंत्रणात आल्यावर मोदी सरकार कोणत्या योजनांवर काम करणार याची माहिती शहांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 'सीएएचे नियम अद्याप तयार करायचे आहेत. कोरोनामुळे अद्याप बरीच प्रक्रिया बाकी आहे. जितक्या लवकर कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल, तितक्या लवकर आम्ही याबद्दल विचार करू,' असं शहा म्हणाले.तृणमूल-भाजपच्या संघर्षामुळे संसार मोडणार?; पत्नीला तलाक देणार भाजप खासदारयावेळी शहांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवरून मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींना लक्ष्य केलं. 'नड्डा यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना समन्स जारी करून त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर बोलावण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. तृणमूलनं केंद्राकडे बोट दाखवण्यापूर्वी नियमांकडे लक्ष द्यावं,' अशा शब्दांत शहांनी ममतांवर निशाणा साधला.
मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन'
By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 5:53 PM