शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळविरांनी..."
3
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
4
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
5
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
6
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
7
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
8
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
9
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
10
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
11
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
12
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
13
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
14
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
15
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
16
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
17
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
18
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
19
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
20
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 6:34 PM

Sharad Pawar On Chief Minister Face of MVA : महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे चर्चेत आली. त्याबद्दल राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. पण, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहरा असू शकतात का, याबद्दल शरद पवारांना काय वाटते?

Sharad Pawar on CM Face Of Maha Vikas Aghadi : सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बद्दल भाष्य केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. जेव्हा शरद पवारांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी वेगळे उत्तर दिले.   

शरद पवारांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. 

अशा चर्चा सुरू आहेत की, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात. तुम्हाला त्याबद्दल काय वाटते? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. 

सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्रिपद, पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, "माझ्या मते. मला जे माहिती आहे, त्यांचा रस संसदेत आहे. खासदार म्हणून काम करण्याची त्यांना आस्था आहे. त्यांची संसदेतील उपस्थिती ९५ टक्क्यांच्या पुढे असते. नुसती उपस्थिती जास्त  असते असे नाही. ११ वाजता सभागृहात गेल्यानंतर सभागृह संपेपर्यंत त्यांची उपस्थिती असते." 

"अनेक प्रश्नांवरील चर्चेत सहभाग होण्यावर तिचे अधिक लक्ष असते. त्याचं रँकिंग असते. संसद सदस्य म्हणून तिचे रँकिंग जास्त आहे. त्याच्यात तिचे लक्ष आहे. राज्यातील सत्तेची स्थळे आहेत, त्याबद्दल फार आस्था तिला आहे, असे मला वाटत नाही", असे उत्तर शरद पवारांनी दिले. 

मुख्यमंत्रि‍पदाबद्दल महाविकास आघाडीचा निर्णय कधी?

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबद्दलही बरीच चर्चा झाली. त्याबद्दलही पवारांनी भाष्य केले. 

शरद पवार म्हणाले, "आता आम्हाला परिवर्तन पाहिजे. बदल पाहिजे. कोण मुख्यमंत्री, हे आम्ही नंतर ठरवू. पहिल्यांदा बदल करू. काही लोकांना असे वाटते की, आधी ठरवले तर त्याचा परिणाम होतो. मला अजिबात वाटत नाही. आज महाराष्ट्रात प्रश्न बदलाचा, परिवर्तनाचा आहे. कुणी नेतृत्व करायचे, हा प्रश्न निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसून सोडवता येईल. यावेळी तो विषय आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही", असे उत्तर शरद पवारांनी दिले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेChief Ministerमुख्यमंत्रीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४