शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

गुजरातेत २०१४ च्या पुनरावृत्तीचे भाजपापुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 6:04 AM

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउण्ड गुजरातकडे देशाचे लक्ष असणार आहे.

- धनंजय वाखारेआगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउण्ड गुजरातकडे देशाचे लक्ष असणार आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २६ जागा भाजपाच्या पारड्यात टाकत गुजरातच्या मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठबळ दिले होते. मात्र, डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला दिलेली टक्कर पाहता २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपासाठी आव्हान असेल, हे स्पष्ट झाले आहे.२०१४च्या यशानंतर दोन वर्षातच भाजपाने आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रूपानी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविली आणि रूपानी यांच्या नेतृत्वाखालीच २०१७ ची विधानसभा निवडणूूकही लढविली. २०१९च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले. भाजपाविरुद्ध अन्य सर्व असा सामना झाला. विधानसभेच्या १८२ जागांपैकी भाजपाला ९९, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. २०१२च्या तुलनेत भाजपाच्या १६ जागा कमी झाल्या तर कॉँग्रेसच्या १६ जागा वाढल्या. या निवडणुकीत भाजपाचा शहरी भागात दबदबा कायम असल्याचे दिसून आले, तर कॉँग्रेसने ग्रामीण भागात मारलेली मुसंडी भाजपासाठी चिंतेची बाब ठरली.राज्यात भाजपाने सहाव्यांदा सत्ता संपादन केली असली तरी त्यासाठी विरोधकांनी उभ्या केलेल्या आव्हानांमुळे भाजपाची मोठी दमछाक झाली. भाजपाचा शहरी भागात वरचष्मा राहिला तर काँग्रेसने ग्रामीण भागात आपले हात-पाय पसरले.पाटीदार, दलित आणि ओबीसी आंदोलनांचा काही प्रमाणात परिणाम दिसून आला; परंतु, त्यामुळे भाजपा उमेदवारांच्या विजयाचा वारू मात्र विरोधकांना अनेक भागात रोखता आलेला नव्हता. हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या अहमदाबादमध्ये भाजपाने १६ पैकी तब्बल १२ जागा खिशात घातल्या, तर कॉँग्रेसला अवघ्या ४ जागा मिळविता आल्या. जीएसटीचाही मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. परंतु, जीएसटीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील २८ पैकी २६ जागांवर भाजपाने विजयश्री मिळविली होती. त्यातही सुरतमधील १६ पैकी १५ जागांवर भाजपाचेच वर्चस्व राहिले. हे गणित पाहता मोदींचा गड खालसा करण्यासाठी विरोधकांना जिवाचे रान करावे लागेल, यात शंका नाही.>सौराष्ट्रमध्ये काँग्रेस दमदारसौराष्टÑातील ४८ जागांपैकी भाजपाने १९, तर कॉँग्रेसने २८ जागा जिंकल्या. सौराष्टÑात कॉँग्रेसचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून आला. दक्षिण गुजरातमध्ये ३५ पैकी भाजपाला २५ तर कॉँग्रेसला ८, कच्छमध्ये भाजपाला ४, तर कॉँग्रेसला २, मध्य गुजरातमध्ये भाजपाला २२ तर कॉँग्रेसला १७ आणि उत्तर गुजरातमध्ये भाजपाला १५ तर कॉँग्रेसला १६ जागा मिळाल्या. विधानसभा निवडणूक निकालाचा प्रभाव लोकसभा निवडणुकीतही राहिला तर भाजपाला कॉँग्रेससमोर घाम गाळावा लागणार हे निश्चित.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Gujaratगुजरात