गांधीनगर : गेल्या तीन दशकांपासून गांधीनगरची जागा ही भाजपच्या ताब्यात आहे. भाजपने यावेळी येथून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेसने येथून दोन वेळा आमदार असलेले सी.जे. चावडा यांना मैदानात उतरविले आहे. भाजपचा हा अभेद्य गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे आव्हान आहे. यापूर्वी नामांकित उमेदवार देऊनही कॉँग्रेसला येथून यश मिळालेले नाही.सहा वेळा सलगपणे गांधीनगरची जागा जिंकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याजागी यंदा भाजपने राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी कॉँग्रेसने येथून काही नामांकित उमेदवारांना उभे करूनही त्यांना विजयश्री संपादन करता आलेली नाही. यापूर्वी कॉँग्रेसने येथून अभिनेते राजेश खन्ना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन तसेच माजी पोलीस उपमहासंचालक पी. के. दत्ता अशा नामांकित उमेदवारांना येथून लढविले होते. यंदा डॉ. सी. जे. चावडा यांना उमेदवारी दिली आहे. चावडा हे शाह यांच्याविरोधात कितपत प्रभाव पाडू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
गांधीनगरचा गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे तगडे आव्हान, तीन दशकांपासून जागा भाजपकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 04:11 IST