शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सांगितला अ‍ॅक्शन प्लॅन, राज्यात सुरू करणार हे अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 9:54 AM

Chandrakant Patil News: राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन दिला आहे.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवूनही युती तुटल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले होते. ही बाब राज्यातील भाजपाच्या नेत्यांना अद्यापही सलत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेत पुन्हा विराजमान होण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांना एक व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन दिला आहे. (Chandrakant Patil give action plan to BJP party Workers for form a government on its own )

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे, त्यात ते  म्हणतात की, आपल्याला आता राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करायचे आहे. १४० आमदार निवडून येण्यासाठी १ कोटी ७० लाख मतांची गरज असते. आपण स्व. अटल बिहारी वाजयपेयी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत राज्यातील २ कोटी लोकांना भाजपाच्या समितीचे सदस्य करत आहोत. 

याबाबत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आपले १०६ आमदारा असूनही आपली मते आहेत १ कोटी ४२ लाख. १ कोटी ७० लाख मतं ज्याला मिळतात त्याला स्वबळावर सरकार स्थापन करता येते. एकट्याच्या ताकदीवर १४० जागा जिंकायच्या असतील १ कोटी ७० लाख मतं आवश्यक  आहेत. आपण काय म्हणतोय की २५ डिसेंबरपर्यंत दोन कोटी लोकांना भाजपाचं सदस्य करायचं. मग १४० येतील की जास्त येतील. १ कोटी ७० लाखाला १४० जागा येतात. ३० लाख अधिक झाले. महाराष्ट्रामध्ये एकट्याने सरकार आणायचे असेल तर हे अभियान यशस्वी करावे लागेल. हे एकट्याने होणार नाही. त्यासाठी ओबीसी आघाडीने प्रयत्न केले पाहिले. आदिवासी आघाडी, जनता युवा यांनी ठरवलं पाहिजे त्यातून राज्यात भाजपाचे दोन कोटी सदस्य होतील आणि राज्यात भाजपाचं सरकार येईल.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १२२ जागा जिंकण्यात यश मिळाले होते. तर २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपाला १०५ जागा जिंकता आल्या होत्या.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण