राज्यसभेत सर्वसाधारण विमा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान गोंधळ, विरोधकांनी फाडली विधेयकाची प्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:49 PM2021-08-11T19:49:23+5:302021-08-11T19:52:55+5:30
mansoon Session : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते.
नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी सर्वसाधारण विमा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बराच गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून खुर्चीवर फेकली. यामुळे कामकाजात कही काळ व्यत्यय आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते.
यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा म्हणाले की, विमा विधेयक कसे आणले जात आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तर, खासदार सुखेंदू शेखर रे यांनी विमा दुरुस्ती विधेयकाला विरोध असल्याचे म्हटले. त्याआधी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेके ओब्रायन म्हणाले होते की, मोदी-शहा यांचे गुजरात मॉडेल आता दिल्लीतही आणले जात आहे. केंद्र सरकारला विमा विधेयक पास करुन घ्यायचे आहे, त्यामुळे संसदेत सध्या खासदारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक आहेत. पण राज्यसभा टीव्ही हे जनतेला दाखवणार नाही.
127 घटना दुरुस्ती विधेयक मंजुर
दरम्यान, या आधी लोकसभेनंतर राज्यसभेतही 127 व्या घटना सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयका अंतर्गत आता राज्यांना इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभेत यापूर्चीव या विधेयकाला मंजुरी मिळाली होती.