शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 6:15 AM

बाळासाहेब थोरात ;  विषयाला फाटे फोडून वातावरण कलुषित करू नका

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. काँग्रेसचा संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहेत. या विषयाला फाटे फोडून कलुषित वातावरण निर्मिती होऊ नये, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

थोरात शुक्रवारी ठाण्यात आले असता त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत. आम्हाला प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. भाजपची जातीयवादी विचारसरणी आणि हुकूमशाही कार्यपद्धती मान्य नसल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवत असताना महाविकास आघाडीत आहोत. सरकारमध्ये प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने चर्चा करून निर्णय घेऊ . 

थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदावरील बदलांबाबत विचारले असता ते म्हणाले, माझ्याकडे तीन महत्त्वाची पदे आहेत. तरुण मंडळींना संधी देऊन नवे नेतृत्व घडवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेऊ शकतात. शासकीय विश्रामगृहात थोरात यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील आदींनी भेट घेतली. . तसेच ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यांबाबतही चर्चा केली. या पुतळ्यांसाठी ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे कार्यकर्त्यांनी थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, मनोज शिंदे, शहराध्यक्ष विक्रांत शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, सुरेश पाटील-खेडे आदी उपस्थित होते.

माझ्याकडे तीन महत्त्वाची पदे आहेत. एकाच व्यक्तीकडे तीन पदे असल्यावर साहजिकच कोणालाही हेवा वाटणार आहे. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते माझ्याकडील जबाबदारीचे विभाजन करू शकतात व इतरांना संधी देऊ शकतात. तरुण मंडळींना संधी देऊन नवे नेतृत्व घडवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेऊ शकतात.- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAurangabadऔरंगाबादAurangabad renameऔरंगाबादचे-नामांतरUddhav Thackerayउद्धव ठाकरे