मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यातच ही कार चोरीची असल्याचे समोर आल्यानंतर काही दिवसांनी या कारचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे धुके दाटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र आता या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी एटीएस करत आहे. केवळ एका माणसासाठी नवी व्यवस्था तयार करता येत नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशीच व्यवस्था होती. मात्र या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारकडे देण्याचा आग्रह असेल तर त्यामागे काहीतरं काहीतरी कुटील डाव असल्याची शंका उपस्थित होतेय. हा डाव आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मनसुख हिरेन प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले, तपासाबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 8:23 PM