जयपूर : राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय संकट आता संपुष्टात आले आहे. मात्र, अद्यापही काही कटुता असल्याचे दिसून येत आहे. राजकीय वादानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची बंडखोर नेते सचिन पायलट यांनी भेट घेतली. या भेटीनंतर बंडखोर १९ आमदारांशिवाय आम्ही बहुमत सिद्ध केले असते, असे विधान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले आहे.
अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांमध्ये राजकीय वाद होता. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर हा वाद आता संपुष्टात आला आहे. हा वाद संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आज भेट झाली. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशाबाबत चर्चा करण्यासाठी सचिन पायलट हे अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी पोहचले होते. यावेळी अशोक गहलोत गटाचे सर्व आमदार सुद्धा उपस्थित होते.
या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जाहीर केले की, विधानसभेत काँग्रेस स्वत: विश्वासदर्शक ठराव मांडेल. याचबरोबर, सचिन पायलट यांची भेट घेतल्यानंतर आम्ही स्वत: विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरून नाराजी दिसून येत होती. ते म्हणाले, "जे झाले ते सर्व काही विसरा. आम्ही, या १९ आमदारांशिवाय बहुमत सिद्ध केले असते." दरम्यान, सचिन पायलट गट पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मुख्यमंत्री गहलोत गटातील आमदार अजूनही नाराज आहेत.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत
शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका