शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Chiplun Flood : "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:18 PM

Chiplun Flood BJP Chitra Wagh Slams Anil Parab : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई - ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यावर दरडसंकट कोसळले आणि त्यात 85 जणांचा बळी गेला. याच दरम्यान कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. जगण्यासाठीची ही धडपड आहे चिपळुणातील पूरग्रस्तांची. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी शुक्रवारी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही. 

वीज नसल्याने सायंकाळनंतर सर्व भाग अंधारला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भयभीत झाले असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत. याच दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Kishor Wagh) यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ऑक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी 8 कोविड रूग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले? हे तर पळपुटे मंत्री आहेत" अशी शब्दांत चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात वेढलेल्या दोन खासगी कोविड रुग्णालयांतील 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. त्यात आठ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते; मात्र पाणी भरल्यानंतर वीजप्रवाह खंडित झाला आणि व्हेंटिलेटर यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या आठही जणांचा मृत्यू झाला. अन्य एका कोविड रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य करणाऱ्यांना सहा मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत चिपळ‌ूणमधील बळींची संख्या 16 वर पोहोचली आहे.

 

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRainपाऊसChiplunचिपळुणChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाAnil Parabअनिल परबPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र