पटणा: केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल झाले. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही जुन्हा मंत्र्यांना डच्चूही देण्यात आला. दरम्यान, लोकशक्ती जनशक्ती पार्टीचे नेते आणि दिवंगत राम विलास पासवान यांचे बंधु पशुपती पारस यांनाही मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. यानंतर आता लोजपाचे नेते आणि पशुपती पारस यांचे पुतणे चिराग पासवान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे लोक जनशक्ती पार्टीतून पशुपती पारस यांना याआधीच काढून टाकण्यात आले आहे. आता त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतल्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त करतो. दरम्यान, चिराग यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचा मानदेखील ठेवला आहे. ते पुढे म्हणाले की, मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचे, हा सर्वस्वी पंतप्रधानांचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्या अधिकाराचा मान ठेवतो. पण, आमच्या पक्षापुरते बोलायचे झाल्यास, पशुपती पारस यांचा लोजपाशी काहीच संबध नाही.
न्यायालयात धावचिराग पारस पुढे म्हणाले की, "लोक जनशक्ती पार्टीतून काढून टाकलेल्या पशुपती पारस यांना लोकसभा अध्यक्षांनी पक्षाचा नेता मानले. आम्ही या निर्णयावरोधा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चिराग पासवान यांच्या वकीलाने या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. 9 जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी होऊ शकते.