- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकजनशक्ती पार्टीच्या (लोजपा) पाच खासदारांनी पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू व चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. लोजपाच्या खासदारांनी लोकसभेतील गटनेते चिराग यांना हटवून त्या पदावर पशुपतीकुमार पारस व उपनेतेपदी मेहबूब अली कैसर यांची निवड केली आहे.
पशुपतीकुमार पारस यांचा आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पारस यांनी सांगितले की, लोजपामध्ये मी फूट पाडली नसून उलट त्या पक्षाला वाचविले आहे. माझ्या नेतृत्वाखालील खासदारांचा गट हा एनडीएबरोबरच राहणार आहे, तसेच चिराग पासवान हे देखील पक्षात राहू शकतात.माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनाच लोजपाच्या लोकसभा गटनेतेपदावरून त्या पक्षाच्या खासदारांनी हटविल्याने ती शक्यताही संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते.
फुटीची बीजे बिहार विधानसभा निवडणुकांतच n गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांत चिराग पासवान यांनी जनता दल (यू) विरोधात भूमिका घेतली होती. n त्यामागे भाजपची फूस होती अशी चर्चा आहे. एनडीएमध्ये राहूनच चिराग यांनी हे कृत्य केल्याने नितीशकुमार कमालीचे नाराज झाले होते. n चिराग यांच्या भूमिकेमुळे जनता दल (यू)ला ३२ जागा गमवाव्या लागल्या असे पक्षाच्या नेत्यांना वाटते. n लोजपालाही विधानसभेत जिंकून आलेला एकमेव आमदार कालांतराने जनता दल (यू)मध्ये सामील झाला. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या मनातील चिरागविषयी राग अद्यापही गेलेला नाही.
काकांनी ठेवले ताटकळतबिहारमधील राजकीय उलथापालथीनंतर चिराग पासवान आपले काका पशुपतीकुमार पारस यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. मात्र तिथे त्यांना सुमारे २५ मिनिटे ताटकळत ठेवण्यात आले. अखेर चिराग यांना त्या घरात प्रवेश मिळाला, पण काका मात्र भेटले नाहीत.