कोलकाता : देश सिंगल विंडो सिस्टिमकडे वाटचाल करत आहे. मात्र, प.बंगालमध्ये वेगळ्याच प्रकारची सिस्टिम काम करत आहे. ही सिंगल विंडो आहे भाईपो (भाचा) विंडो. प.बंगालमध्ये यातून गेल्याशिवाय काहीच काम होत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर शनिवारी टीका केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वोट बँकेच्या राजकारणासाठी तुष्टिकरणाचा खेळ खेळत आहेत. त्यांनी राज्यात केवळ माफिया उद्योग चालू दिला, अशी टीकाही मोदी यांनी केली.
खडगपूर येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, तृणमूलच्या सरकारने गत दहा वर्षात रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी रोखण्याचे काम केले. तृणमूलच्या वुसलीमुळे अनेक जुने उद्योग बंद झाले. येथे केवळ माफिया उद्योग चालू दिला. मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता, ते म्हणाले की, सुवर्ण रेखा नदी आणि कंसवती नदीत अवैध खाणीचे कनेक्शन कुठून जोडलेले आहे, हे सर्वांना ठाऊक आहे.
केंद्राच्या योजनांना मुख्यमंत्र्यांचा खोडामोदी म्हणाले की, ममता या विध्वंसाची शाळा चालवितात. याच्या अभ्यासात खंडणी, कट मनी, अराजकता यांचा समावेश आहे. केंद्राने लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना चालविल्या. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्री केंद्राच्या योजना रोखण्यासाठी भिंतीप्रमाणे उभ्या आहेत. nमात्र, आता बंगालमध्ये विकास पर्व सुरू होणार आहे. दीर्घ काळ राज्याच्या विकास न होऊ देण्यात काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.