मुंबई: शिवसेनेच्या ५५ व्या वर्धानपनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच या दिवशी मुख्यमंत्रीपदाची वस्त्रे काही काळ बाजूला ठेवत आहे. हे भाषण करताना, समोर जल्लोष करणारे शिवसैनिक नसल्याने हा संवाद मला भाषण वाटत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. यानंतर एकेका मुद्द्याला हात घालताना कोरोना संकटाच्या विषयावर बोलताना घराबाहेर न पडताही काम होऊ शकतात, हे दाखवून दिले, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. (cm uddhav thackeray replies opposition on their criticism of he not do work from home)
कोरोनाचे संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याबाबत सातत्याने विरोधकांकडून टीका होता होती. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचे आहे की, घरातून काम करतोय तर एवढे काम होत आहे, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
सत्ता नसल्याने अनेकांचा जीव कासाविस होतोय, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला टोला
मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने जनतेला आवाहन करत आहे की, घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. पण मी लवकरच बाहेर पडणार आहे, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिली. तसेच सत्तेत सहभागी होता आले नाही. म्हणून अनेकांच्या पोटात दुखत आहे. पण शिवसेना त्यांना औषध देईल. गेल्या ५५ वर्षात शिवसेनेने अनेक पक्षांचे रंग, अंतरंग पाहिले आहेत, या शब्दांत शिवसेनेने विरोधकांना सुनावले.
“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले
दरम्यान, अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ स्वबळाचा नारा. स्वबळ तर हवंय. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चे बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेने दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.