शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:47 PM

Shiv Sena MP Vinayak Raut : सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असे विनायक राऊत म्हटले आहे.

ठळक मुद्दे'संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही'

रत्नागिरी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच, याप्रकरणी कथित आरोप असणारे ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केले आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते, असे सांगत याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे विनायक राऊत म्हटले आहे. (Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter)

गुरुवारी विनायक राऊत यांनी 'TV9 मराठी' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवी येथी झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही. तसेच, या प्रकरणावरुन राज्यातील महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. मात्र, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही. या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, या प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

संजय राठोड यांनी काल घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!संजय राठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ दोनच मिनिटं संजय राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Rautविनायक राऊत Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा