शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 1:35 PM

UP Elelction: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election)  रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातही राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवी दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत आता उत्सुकता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. (up CM Yogi Adityanath meets PM Narendra Modi at his official residence in New Delhi)

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यास योगी आदित्यनाथ अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे. यामुळे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेश जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. 

पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ भेट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये  तासभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांच्या निवास्थानी गेले होते. या दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय महत्वपूर्ण चर्चा झाली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

“भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही”

योगी आदित्यनाथ यांचे भेटीसत्र

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरूवारी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली व त्यांच्यात जळपास दीड तास चर्चा झाली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर योगी आदित्यनाथ भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”

दरम्यान, भाजपा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व बदलाबाबत सध्या तरी विचारात नाही, मात्र अन्य काही महत्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात. भाजपाचे वरिष्ठ नेता बीके संतोष यांच्या नेतृत्वातील पथकाकडून जळवपास आठवडभरापूर्वी उत्तर प्रदेश सरकारबाबत आढावा घेण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेशमधील मंत्री, खासदार, आमदार आणि मुख्यमंत्र्यांसोबत बीके संतोष यांनी बैठक घेतली होती. 

टॅग्स :Politicsराजकारणprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथNew Delhiनवी दिल्लीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक