शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजप व सेनेतील वादाला तक्रारींचे खतपाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:33 AM

सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत.

सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत. एकमेकांच्या हितसंबंधाआड येताना तक्रारींद्वारे सूड उगविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सदस्यांनी न.प.च्या बैठकीवर बहिष्कार घालताच भाजपने अवैध धंदे, वीज जोडण्या तोडू नये, असे मुद्दे काढून सत्ताधारी सेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हिंगोली नगरपालिकेत थेट जनतेतून निवडून आलेले भाजपचे बाबाराव बांगर हे नगराध्यक्ष आहेत. दुसरीकडे सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांचे संख्याबळ जास्त आहे. यापैकी राष्ट्रवादीचेही दिलीप चव्हाण संख्याबळावर उपनगराध्यक्ष झाल्याने राष्ट्रवादी अर्धी सत्तेतच आहे. काँग्रेसला न.प.त सत्तेत कोण आहे, याचा फरक पडत नाही. मात्र, भाजपकडून शिवसेनेला बऱ्याचदा सापत्न वागणूक मिळते, असा वारंवार आरोप होतो. यापूर्वीही शहरातील विकास कामांवरून शिवसेनेचे कळमनुरीचे आ. संतोष बांगर यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आ. बांगर यांनी मर्जीतील अधिकाऱ्यांची न.प.त वर्णी लावली. मध्यंतरी सगळे आलबेल असताना आ. बांगर यांचे बंधू तथा शिवसेना गटनेते यांनी अर्थसंकल्पीय बैठकीवर बहिष्कार टाकताना न. प. तील कामांच्या दर्जावर तसेच भूमिगत गटार योजनेच्या अर्धवट कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावरून पुन्हा ठिणगी पडली. भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनीही सत्ताधारी सेनेला कोंडीत पकडताना जिल्ह्यात अवैध धंदे, वाळू उपसा जोमात सुरू आहे, असा आरोप करून निवेदने दिली. आंदोलनाचा इशारा दिला. महावितरण जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने वसुलीला आलेल्यांना पिटाळून लावा, असे आवाहन केले. यामुळे पुन्हा भाजप व शिवसेनेतील वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.लोकप्रतिनिधींनीच खेचला निधीजिल्हा वार्षिक योजनेत पुनर्विनियोजनात जिल्ह्यात वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीच आपल्या कामांना प्राधान्य देत निधी खर्ची घातल्याचा आराेप जि.प.सदस्य व नगरसेवकांतून होत आहे. यामध्ये काँग्रेसने मात्र आपल्या जि.प.सदस्य, नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य दिले. शिवसेना व राष्ट्रवादीत मात्र तसे न घडल्याने यावरून ओरड होत असल्याचे दिसून येत होते. यात आमदार व खासदारांनीच आपल्या कामांना प्राधान्य दिल्याची ही ओरड आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते मात्र शेवटपर्यंत निधी मिळावा, यासाठी लढा देताना दिसत होते.पंचायत समित्यांत होतेय खांदेपालटसध्या शिवसेना, काँग्रेसने एकापेक्षा जास्त जणांना संधी मिळावी म्हणून पंचायत समितीत खांदेपालटाची टूम काढली आहे. हिंगोली पंचायत समितीत काँग्रेसच्या उपसभापतीने राजीनामा दिल्यानंतर आता सेनेच्या सभापतींनीही राजीनामा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत येथे सत्ता स्थापन केली होती. आता हे दोन्ही पक्ष नवे पदाधिकारी देणार आहेत. त्याचबरोबर सेनगावातही शिवसेनेने सभापती पदाचा राजीनामा दिला. आता येथे काँग्रेसचा सभापती होणार असल्याची चर्चा आहे.  निवडणुका वर्षभरावर आल्या असताना होत असलेल्या या बदलांतून काय साध्य होणार हा प्रश्नच आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा