काँग्रेसच्या उमेदवारीने ‘स्वाभिमानी’ला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 05:21 AM2019-01-31T05:21:28+5:302019-01-31T05:22:28+5:30

बुलडाण्यासाठी शेट्टी आग्रही; राज्यातील चार मतदार संघांवर दावा

Congratulations to Congress' Swabhimani! | काँग्रेसच्या उमेदवारीने ‘स्वाभिमानी’ला धक्का!

काँग्रेसच्या उमेदवारीने ‘स्वाभिमानी’ला धक्का!

Next

- राजेश शेगोकार 

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सहा जागांचा प्रस्तावही औपचारिक स्वरूपात दिला असून, त्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता; मात्र काँग्रेसने या जागेवर चारूलता टोकस यांच्या नावाची शिफारस पक्ष हायकमांडकडे करण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभिमानीला धक्का बसला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा, बुलडाणा या चार मतदारसंघांचा प्रस्ताव काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दिला आहे. स्वाभिमानीकडून वर्ध्यातून सुबोध मोहिते व बुलडाण्यातून रविकांत तुपकर लढण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही मतदारसंघाच्या माध्यमातून स्वाभिमानीला विदर्भात आपली ताकद वाढवायची आहे; मात्र आता वर्ध्याच्या जागेवर काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षेश्रष्ठींकडे पाठविली असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पृष्ठभूमीवर स्वाभिमानीच्या प्रस्तावालाच काँग्रेसने धक्का दिला असल्याने महाआघाडीत स्वाभिमानीच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेकापला गृहीत धरू देणार नाही
शेतकरी कामगार पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीबरोबर राहणार आहे; पण आम्हाला योग्य सन्मान दिला गेला पाहिजे. आम्हीही त्यांना गृहीत धरूदेणार नाही, असे शेकापचे मराठवाडा विभागीय चिटणीस भाई विकासकाका शिंदे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
मराठवाड्यात शेकापला विधानसभेच्या किमान सहा जागा मिळाव्यात, असा आग्रह आधी आम्ही पक्षाकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

खा. राजू शेट्टींनी मांडलेल्या संपूर्ण कर्जमुक्ती तसेच दीडपट हमीभाव या विधेयकांचा जाहीरनाम्यात समावेश आणि सरकार आल्यावर विधेयक मंजुरीची ग्वाही या सोबतच स्वाभिमानीला सन्मानजनक जागा या अटीवरच आम्ही महाआघाडीत सहभागी होणार आहोत.
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Congratulations to Congress' Swabhimani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.