शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
2
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
4
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
7
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
10
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
11
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
13
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार
14
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
15
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
16
Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
20
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका

Farmers Protest : "जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 6:44 PM

Farmers Protest : कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस आणि शेतकरी मागे हटणार नाही, प्रियंका गांधींचा इशारा

ठळक मुद्देकितीही वर्षे लागली तरी काँग्रेस आणि शेतकरी मागे हटणार नाही, प्रियंका गांधींचा इशारा'हम दो हमारे दो'चं सरकार प्रियंका गांधी पुन्हा कडाडल्या

मेरठमधील सरधाना येथील केली या गावात रविवारी काँग्रेसकडून महापंचायत बोलावण्यात आली होती. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या ठिकाणी जमलेल्यांना संबोधित केलं. "कृषी कायदे मागे घेण्यासाठी कितीही वर्षे लागली तरी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभी राहिल. यासाठी १०० दिवस लागले किंवा १०० वर्षे लागली तरी शेतकरी आणि काँग्रेस मागे हटणार नाही," असं त्या म्हणाल्या."माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तोवर मी लढणार. यासाठी मग १०० दिवस असो किंवा १०० वर्ष. संसदेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला. आंदोलनजीवी, परजीवी असा उल्लेख करून त्यांचा अपमान करणअयात आला. दिल्लीतील सीमेप्रमाणेच प्रत्येक गावागावात आंदोलन करा. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहिल. सुख आणि दु:ख काहीही असो आम्ही तुमच्यासाठी कायम उभ असू. तुमची लढाई माझी आहे," असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.

'हम दो हमारे दो'चं सरकारपंतप्रधान नरेंद्र मोदी चीनपासून पाकिस्तान सर्व ठिकाणी फिरून आले. 'हम दो हमारे दो' मित्र सरकार चालवत आहेत. जे प्रकर्षानं दिसूनही येत आहे. सरकारला तुमचं ऐकावंच लागेल. अशा माहोल तयार करा की सरकार तुमच्या सुनावणीशिवाय सरकार पुढे जाऊ शकणार नाही, असंही त्या म्हणाल्या.ऊसाचीही थकबाकी"उत्तर प्रदेशात ऊसाची १० हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ हजार कोटी रूपयांना दोन विमानं विकत घेतली. संसदेच्या नव्या इमारतीसाठी पैसे खर्च करत आहे. थकबाकी देण्याऐवजी ते विमानं विकत घेत आहेत. तुमच्या विम्यामुळे हजारो रूपये अब्जाधीशांच्या खिशात गेले आहेत," असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मतांचं राजकारण नाही"आमच्यासाठी हे मतांचं राजकारण नाही. आम्ही तुमचं देणं लागतो. तुम्ही अन्नदाते आहात. तुमची लढाई ही माझी लढाई आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत लढतच राहणार. यासाठी मग १०० दिवस लागतील किंवा शंभर महिने. जोपर्यंत सरकार हे काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन