मुंबई : प्रचारादरम्यान ‘मोदी मोदी’च्या घोषणा देणाऱ्या सामान्य प्रवाशांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोरीवली येथे मारहाण केली. मारहाण करणारे काँग्रेसचेच असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या साºया प्रकारात एक महिला प्रवासी जखमी झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाºया ऊर्मिला मातोंडकर यांना सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्तीने इतका त्रास का झाला, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केला.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा कांगावा ऊर्मिला मातोंडकर यांनी केला होता. आता मातोंडकर यांच्यासमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देणाºया युवकांना मारहाण केली. यात एका युवतीलाही मार लागला. अभिव्यक्तीवर गळे काढणारेच सामान्यांच्या अभिव्यक्तीची गळचेपी करत आहेत, असे तावडे म्हणाले.बोरीवलीमधील घटनेत काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश निर्मल व अन्य कार्यकर्त्यांनी सामान्य प्रवाशांना मारहाण केल्याचे न्यूज चॅनेलच्या फूटेजमध्ये दिसत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही बोरीवली पोलीस ठाण्यामध्ये केल्याचे सांगतानाच तावडे म्हणाले की, तुमच्या समोर तुमच्याच कार्यकर्त्यांनी एका महिलेवर हात उगारणे हे दुर्दैवी आहे. प्रचारासाठी ऊर्मिला मातोंडकर यांनी हवे तितके पोलीस संरक्षण घ्यावे. आवश्यक असल्यास बाउन्सरही घ्या. पण याच्या आधारे तुम्हाला मते मिळणार नाहीत, असा टोला मारला.>प्रियांकांना विस्मरणनरेंद्र मोदी राज्यघटना बुडवायला निघाले आहेत, असे विधान करणाºया प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना तावडे म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून मोठा गुन्हा केला होता. जी राज्यघटना डॉ. आंबेडकर यांनी तयार केली, त्यावर इंदिरांजींनी आघात केला होता, याचे बहुतेक प्रियांका गांधी यांना विस्मरण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या यांच्या भूलथापांना नांदेडची जनता बळी पडणार नसल्याचेही तावडे म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली प्रवाशांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 5:41 AM