विजयवाडा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाशी युती न करता स्वबळावर लढत देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या राज्यात लोकसभेच्या २५ व विधानसभेच्या १७५ जागा आहेत. प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयाला राहुल गांधी यांनी हिरवा कंदिल दाखविला. तेलंगणातील पराभवाने आंध्रात तेलुगू देसमशी जागावाटप करावे का, याबाबत काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत होते. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीच्या काही नेत्यांनी तेलुगू देसमशी आघाडीचे समर्थनच केले. काहींनी वायएसआर काँग्रेस व जन सेना या पक्षांशीही आघाडी करावी अशी मागणी केली. >सामुदायिक नेतृत्वाची गरज - चंद्राबाबूविरोधी पक्षांच्या महाआघाडीने सामुदायिक नेतृत्व स्वीकारावे ही काळाची गरज आहे असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधानपदासाठी सुयोग्य उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. मग ते नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वा अन्य कोणाचेही असू शकेल, पण आता हे सारे नेते एकजुटीने काम करीत आहेत.>आंध्रच्या विशेष दर्जासाठी प्रयत्नप्रदेश काँग्रेसच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींकडून स्वबळावर लढण्यास तयार व्हा, असा निरोप आला. त्यानुसार विचारविनिमय करून एकट्याने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आंध्र प्रदेशला केंद्राला विशेष दर्जा द्यावा या मागणीभोवती निवडणूक प्रचार केंद्रित करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.
आंध्रात काँग्रेस स्वबळावर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 6:02 AM