मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी विविध समित्या बुधवारी जाहीर केल्या. तसेच १३ जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यात समन्वय समितीच्या अध्यक्षपदी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रसिद्धी आणि प्रकाशन समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर महाजन, प्रसार माध्यम आणि जनसंवाद समितीच्या अध्यक्षपदी कुमार केतकर, निवडणूक व्यवस्थापन चमूच्या अध्यक्षपदी शरद रणपिसे, जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.तर याच जाहीरनामा समितीत नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर तसेच राज्याचे माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील १३ जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : रायगड - माणिक जगताप, उल्हासनगर - राधाचरण करोटिया, मीरा-भाईंदर - अंकुश मालुसरे, पनवेल - आर. सी. घरत, नाशिक - डॉ. तुषार शेवाळे, जळगाव - डॉ. राधेश्याम चौधरी, वर्धा - मनोज चांदूरकर, चंद्रपूर - सुभाष धोटे, जालना - राजाभाऊ देशमुख, उस्मानाबाद - प्रशांत चेडे, कोल्हापूर (ग्रामीण) - प्रकाश आवाडे, सातारा - रणजितसिंह नाईक -निंबाळकर, नवी मुंबई - अनिल कौशिक.
काँग्रेसकडून राज्यातील विविध समित्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 6:24 AM