शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

नऊ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्याला काँग्रेसनं 'चुकून' महासचिव केलं; अन्...

By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 10:37 AM

काँग्रेसवर ओढवली नामुष्की; पक्षावर नियुक्ती रद्द करण्याची वेळ

भोपाळ: मध्य प्रदेशातील युवक काँग्रेसला वेगळ्याच नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे. नऊ महिन्यांपूर्वी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात गेलेल्या एका नेत्याची नियुक्ती काँग्रेसनं महासचिवपदी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. याबद्दलची चर्चा रंगल्यावर काँग्रेसनं लगेचच संबंधित नेत्याची नियुक्ती रद्द केली. मध्य प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी हर्षित सिंघई यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर हर्षित यांना अनेकांनी अभिनंदनाचे फोन केले. यामुळे हर्षित यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण हर्षित यांनी मार्च महिन्यात काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हर्षित यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत पक्ष सोडला आणि कमळ हाती घेतलं. मात्र काँग्रेसनं त्यांच्याकडे असणारा रेकॉर्ड अपडेट केला नाही. त्यामुळे आता काँग्रेसला नामुष्कीचा सामना करावा लागला आहे.भाजपचा 'आनंदी' शेतकरी करतोय आंदोलन; आता भाजपलाच नोटीस पाठवणारयुवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक शुक्रवारी संपली. यामध्ये हर्षित सिंघई यांची १२ मतानं महासचिवपदी निवड झाली. त्यानंतर हर्षित यांना अभिनंदनाचे फोन येऊ लागले. हा संपूर्ण प्रकार अतिशय हास्यास्पद असल्याचं सिंघई म्हणाले. 'या निवडणुकीत कोणालाही रस राहिलेला नव्हता. युवक काँग्रेसनं माझी महासचिव म्हणून निवड केली. पण मी १० मार्चलाच ज्योतिरादित्य सिंधियांसोबत काँग्रेस पक्ष सोडला आहे,' असं सिंघई यांनी सांगितलं.J&K DDC Result: जम्मूमध्ये भाजपा बनला सर्वात मोठा पक्ष; तरीही गुपकार युती आघाडीवर'काँग्रेसमध्ये असताना मी तीन वर्षांपूर्वी महासचिव पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यानंतर पक्षानं वारंवार निवडणूक घेणं टाळलं. आधी २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे, त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे संघटनात्मक निवडणूक टाळण्यात आली. मी सिंधियांसोबत काँग्रेस सोडताना माझा उमेदवारी अर्ज रद्द करा, असं पक्षाला सांगितलं होतं. त्यासाठी मी दोनदा फोन केले. त्यानंतर मला पक्ष सोडण्याचं कारण मेल करण्यास सांगितलं. मी कमलनाथ आणि राहुल गांधींना तसा मेलदेखील केला. पण त्यानंतरही काँग्रेसनं रेकॉर्डमध्ये बदल केला नाही. अनेक ठिकाणी काँग्रेसनं हेच केलं आहे. विविध पदांवर पक्ष सोडून गेलेल्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत,' असं सिंघई म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा