पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 09:45 AM2020-12-04T09:45:44+5:302020-12-04T09:46:17+5:30

Pune Vidhan Parishad Election, Pune Teacher constituency: जयंत आसगावकर यांना पहिल्या फेरीत १६ हजार ८७४ मते पण विजयासाठी आवश्यक आकडा अद्याप प्राप्त नाही

Congress awaits victory in Pune Shikshak constituency; second preference count begins | पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु

पुणे शिक्षक मतदार संघात काँग्रेसला विजयाची प्रतिक्षाच; दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती क्रमांकाची सर्वाधिक मते पडलेल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते पडली आहेत. मात्र विजयी आकडा गाठण्यासाठी आसगावकर यांना बरीच वाट पाहावी लागत आहे. 


       पहिल्या पसंती क्रमांकात सर्वाधिक मते मिळालेल्या आसगावकर यांना विजयासाठी 24 हजार 114 मतांची आवश्यकता आहे. मात्र मोजणीचे 'एलेमिनेशन' चे 19 फेऱ्या झाल्या तरी अपेक्षित मतसंख्या गाठता आलेली नाही. शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पार पडलेल्या 19 फेऱ्याअखेर आसगावकर यांना 17 हजार 400 मते पडली आहेत. तर जितेंद्र पवार यांना ५ हजार 947 मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 288 मते मिळाली आहेत. 

पुणे विभागात पदवीधर पेक्षा शिक्षक मतदार संघातील मतमोजनीचा निकाल सर्वात अगोदर लागेल असे चित्र होते. परंतु प्रत्यक्षात हे चित्र उलटे झाले. पदवीधर मध्ये अरुण लाड यांनी पहिल्याच पसंतीत विजयी कोट्या पेक्षा अधिक मते मिळवली. परिणामी  'एलेमिनेशन' च्या पुढील फेऱ्यांची आवश्यकताच आली नाही.
     तर दुसरीकडे शिक्षक मतदार संघात आसगावकर यांनी 6 हजार 112 मतांची पहिल्या पसंती क्रमांकात विक्रमी आघाडी घेऊनही त्यांना आवश्यक विजयी आकडा गाठण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षक मतदार संघात मतदानाचा आकडा पाहता एकूण 32 फेऱ्या होणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 पर्यंत 19 फेऱ्या झाल्या होत्या.

पदवीधर मतदारसंघ जिंकला

पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत. त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा  पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.


       पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 लाख 14 हजार 137 हा विजयी कोटा ठरविण्यात आला. एकूण 112 टेबल वर ही मतमोजणी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे ही मतमोजणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालेल असे बोलले जात होते. मात्र पहिल्याच पसंती क्रमांकात लाड यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळवून आपला विजय निश्चित केला. पदवीधर निवडणूक च्या निकषानुसार वैध मतांच्या 50 टक्के अधिक 1 अशी मते लाड यांनी मिळविल्याने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लाड यांचा विजय निश्चित झाला आहे. सकाळी 10 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाईल.

Web Title: Congress awaits victory in Pune Shikshak constituency; second preference count begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.