“आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’, अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 06:49 PM2021-07-10T18:49:23+5:302021-07-10T18:50:39+5:30
आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ असून, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अहमदनगर: राज्यातील विधानसभा अध्यक्षपदावरूनही महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहे. तालिका अध्यक्ष असलेले भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षपद मिळण्याबाबत उत्सुक असल्याचे दिसत आहेत. तर, दुसरीकडे वनमंत्री संजय राठोड यांचे रिक्त झालेले पद काँग्रेसला द्यावे आणि त्या बदलत्यात विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेने घ्यावे, अशीही पक्षातून मागणी होत आहे. यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ असून, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (congress balasaheb thorat react on post of speaker of maharashtra assembly)
दोन दिवसांपूर्वी अधिवेशन पार पडले. विधानसभेचे अधिवेशन गाजवले की नाही हे आता कळतेय. विधानसभा अध्यक्ष म्हणून बसण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. विधानसभा अध्यक्ष पदावर चर्चा सुरू आहे. भास्कर जाधवांना विधानसभा अध्यक्ष केल्यास सभागृह सांभाळू शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
“तसं काही नव्या सहकार मंत्रालयाकडून होऊ नये”; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने व्यक्त केली भीती
जाधव यांनी अधिवेशनात चांगलेच काम केले
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतूकच आहे. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार नाही. आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ आहेत, हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षातही असे सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आले आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा अगर विचार झालेला नाही, असे नमूद करत अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया असल्याने आणि कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये, यासाठी वातावरण निवळल्यावरच ही निवडणूक घ्यावी लागेल, असेही थोरात म्हणाले.
“भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”
दरम्यान, भाजपानेही माझे कौतुक केले. कटू प्रसंग येतात, माझेही निलंबन केले होते. मी रागावलो नव्हतो, ते का रागावले माहिती नाही. भाजपाच्या अनेक लोकांनी माझे भरभरून कौतुक केले. अधिवेशनाच्या शेवटी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरत त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माझ्यात चांगल्या गप्पा झाल्या. आम्ही एकमेकांशी विचारपूसही केली असे भास्कर जाधवांनी सांगितले.