"काँग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी राहायची आली वेळ"; बाळासाहेब थोरातांनी लगावला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:03 IST2021-03-27T13:56:19+5:302021-03-27T14:03:17+5:30
Congress Balasaheb Thorat : "राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार आहे. भाजपा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे.

"काँग्रेस सोडणाऱ्यांवर पायरीवर उभी राहायची आली वेळ"; बाळासाहेब थोरातांनी लगावला सणसणीत टोला
अहमदनगर : काहींना वाटले भाजपात गेले की मंत्रीपदं मिळतात. डावपेच करायला जातात आणि तेच फसतात. काँग्रेस सोडणाऱ्यांवर आता पायरीवर उभा राहायची वेळ आली अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाव न घेता विरोधकांवर केली आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
थोरात म्हणाले, कठीण काळातही आम्ही काँग्रेस सोडली नाही. म्हणून आज माझ्याकडे मंत्रीपद आहे. आपण विचारांवर ठाम राहिले पाहिजे. विरोधकांनी काँग्रेस सोडली अन् त्यांच्यावर पायरीवर उभी राहण्याची वेळ आली. डावपेच करत असताना स्वत:च फसतात. राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार आहे. भाजपा समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात धर्माधर्मात भांडणे लावून देश रसातळाला नेण्याचे काम सुरू आहे. नोटबंदी, जीएसटी, पेट्रोल दरवाढीने अर्थव्यवस्थेची वाट लागली आहे. एक रुपया पेट्रोल वाढले तरी आंदोलन करणारे भाजपवाले आज गप्प आहेत. कृषीच्या कायद्याने महागाई वाढणार आहे.
Narendra Modi in Bangladesh : नाना पटोलेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, म्हणाले...https://t.co/MTfZR22vco#NarendraModi#NanaPatole#BJP#Congress#politics#FarmerProtests#Bangladeshpic.twitter.com/iQTIFdAyij
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2021
"विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे महाराष्ट्राने पाहिलं"https://t.co/vSHrmd5Ixh#rohitpawar#DevendraFadnavis#NCP#BJP#ParambirSinghLetter#MaharashtraGovernment#Politics@RRPSpeaks@RohitPawarSpeakpic.twitter.com/MLzcOkxm7L
— Lokmat (@MiLOKMAT) March 23, 2021