मुंबई: राज्यात आताच्या घडीला आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन्ही मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला असून, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्याचे काय झाले, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे. (congress balasaheb thorat taunt on devendra fadnavis over separate vidarbha issue)
शनिवार, २६ जून रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. यावेळी नागपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेण्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. यावरून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांची घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे तुम्ही फार गांभीर्याने घेतले आहे. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. मात्र, तसे झाले नाही. सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. सामान्यांना फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर काय झाले आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका थोरात यांनी केली.
कोव्हिशिल्डची लस घेतलीय? ‘या’ देशांमध्ये प्रवेश नाही; परदेशी जाणाऱ्यांच्या चिंतेत भर!
तर मी स्वतः त्यांची भेट घेईन
देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले आहे, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रे दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.