शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

राष्ट्रवादी- भाजपाच्या लढाईत कॉँग्रेस केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 7:16 PM

दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ऐवढीच कांचन कुल यांची ओळख नाही. भाजपाची ‘कुल’ खेळी राष्ट्रवादीने गांभिर्याने घेतली आहे.

ठळक मुद्देहर्षवर्धन पाटील यांची मनधरणी। राष्ट्रीय समाज पक्षाची समजूत काढण्यात यश

अविनाश थोरात बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांनी आव्हान दिले आहे. बारामतीतील लेकींच्या या संघर्षात राष्ट्रवादी- भाजपाची लढाई होणार असली तरी निवडणुकीच्या केंद्रस्थानी कॉँग्रेस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात कॉग्रेसला कधी नव्हे ते महत्व या निवडणुकीत मिळाले आहे. दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी ऐवढीच कांचन कुल यांची ओळख नाही. त्या स्वत: बारामतीच्या असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. भाजपाची ही ‘कुल’ खेळी राष्ट्रवादीने गांभिर्याने घेतली आहे. सध्या या मतदारसंघात सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे तर चार इतर पक्षांचे आहेत. इंदापूर, भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदरमध्ये कॉँग्रेसची ताकद आहे. कुल यांना छुप्या पध्दतीनेही ही ताकद मिळू नये यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळेच कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी पवार कुटुंबियांच्या चकरा सुरू आहेत. सर्वात प्रथम सुप्रिया सुळे, नंतर अजित पवार आणि मंगळवारी शरद पवार यांनी पाटील यांची भेट घेतली. तीन वेळा भेटण्याच्या कारणांची चर्चा सुरू आहे. इंदापूर आणि पुरंदरच्या जागा सोडण्याचे आश्वासन घेण्याच्या तयारीत कॉँग्रेस आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वत:च्या बारामती मतदारसंघात कॉँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच ही स्थिती येणार आहे.दुसऱ्या  बाजुला कांचन कुल यांनी भाजपाचे चिन्ह घेतल्याने रासपची नाराजी दूर झाली आहे. महादेव जानकर त्यांचा अर्ज भरताना उपस्थित होते. शहरी मतदानावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे कुल यांचे धोरण आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीच्या बालेकिल्याला भगदाड पाडण्यासाठी तळ ठोकला आहे.  शिवसेनेचीही साथ आहे. मात्र, गेल्या वेळी जातीय समीकरण आणि पवारांविरुध्दची नाराजी कॅश करण्यात भाजपाला यश मिळाले होते. त्याच पध्दतीचे वातावरण या वेळी तयार होणार का हा प्रश्न आहे. गेल्या वेळीच्या झटक्याने सुप्रिया सुळे यांनी पाच वर्षे मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला. त्यांच्या विरोधात भाजपाच्या नवख्या उमेदवार  टिकणार का, हे औत्सुक्याचे आहे. ..........जनतेच्या कर रुपातून जमा पैसा स्वत:ची जाहिरात करण्यासाठी वापरला. हा पैसा शेतकºयांची कर्जमाफी करण्यासाठी वापरला असता. या सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला फसविण्याचे काम केले. शेतीमालाला हमीभाव देण्याबरोबर बेरोजगारीचा प्रश्न आहे. - सुप्रिया सुळे,  राष्टÑवादी..........सर्वसामान्य जनता आणि महायुती आमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. बारामतीच्या बाहेर विकास झालेला नाही. येथील जनतेला आजही टॅँकरच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागते. - कांचन कुल, भाजपा..............कळीचे मुद्देबारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीशिवाय इतर भागांचा विकास झालेला नाही. यासाठी शरद पवार यांना जबाबदार धरले जात आहे. भारतीय जनता पक्षाची धोरणे शेतकरी विरोधी आहेत, साखर उद्योगाला मारक असल्याची टीका राष्ट्रवादी कडून केली जात आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा