ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

By प्रविण मरगळे | Published: February 12, 2021 04:37 PM2021-02-12T16:37:06+5:302021-02-12T16:37:46+5:30

Nana Patole Take Charge from Balasaheb Thorat of Congress State President Post: नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे.

Congress demonstrates in Mumbai with tractor rally; Nana Patole accepted the post of State President | ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

ट्रॅक्टर रॅली काढून मुंबईत काँग्रेसचं शक्तीप्रदर्शन; नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

googlenewsNext

मुंबई – काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे, मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मुंबईत काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (Nana Patole Take Charge of Congress State President today)

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री सुनील केदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर दादर येथील जैन मंदिराला भेट दिली. नंतर चैत्यभूमीवर जाऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच माहीम दर्गा येथे जाऊन चादर अर्पण केली व माहीम चर्चला भेट दिली. त्यानंतर पटाले गुरु तेग बहादूर नगर येथील दशमिरा दरबार गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन केले.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा ऑगस्ट क्रांती मैदानावर होत आहे. मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यास नाना पटोले पुष्पहार अर्पण करून विधानभवन येथील महापुरुषांना तसेच दक्षिण मुंबईतील महापुरुषांना ते अभिवादन केलं त्याचसोबत हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालयापासून ट्रॅक्टरने गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास करत तेथे लोकमान्य टिळक पुतळ्यास तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तेथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत बैलगाडीने प्रवास करणार आहेत.  पदग्रहण सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम ऑगस्ट क्रांती मैदान येथे होत आहे.

२ लाख गांधीदूत नेमणार

भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतीलं असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

भाजपा खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी

स्व. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते, मात्र त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजपा आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. भाजपाकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल व सत्य माहिती जनेतसमोर आणेल. भाजपाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपप्रचार केला जातो. भाजपा ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपाला काँग्रेसकडून उत्तर मिळेल असा इशारा नाना पटोलेंनी दिला होता.

Web Title: Congress demonstrates in Mumbai with tractor rally; Nana Patole accepted the post of State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.