नवी दिल्ली - केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरू असलेला खटला बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावरुनच आता काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह (Congress Digvijaya Singh) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हवं, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. फेब्रुवारी 2012 मध्ये केरळच्या किनाऱ्याजवळ दोन मासेमारांना मारुन टाकल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर होता. या प्रकरणाची सुनावणीही सुरू होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने भारतातील ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता इटलीच्या कायद्यानुसार त्याच देशामध्ये पुढील कारवाई होणार आहे.
पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई सौम्यप्रकारे चालली असल्याची टीका करत सोनिया गांधींवर जोरदार टीका केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एनडीए सरकारने मौन बाळगल्याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. दिग्विजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. या निर्णयानंतर नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. एका युजरच्या ट्विटला उत्तर देत दिग्विजय सिंह यांनी "मी याबद्दल सहमत आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणं अशक्य आहे" असं म्हटलं आहे.
दहशतवाद, हुकुमशाही आणि हिंसक अतिरेकामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून मूल्यांचे रक्षण करण्यासाठी भारत ‘जी-7’ राष्ट्रांचा सहयोगी असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली. लंडनमध्ये होत असलेल्या ‘जी-7’ राष्ट्रांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी व्हर्चुअल माध्यमातून सहभाग घेऊन भारताची भूमिका मांडली. महत्त्वाचे म्हणजे मोदींनी केलेल्या ‘ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’ (ट्रीप्स) करारातून सूट देण्याच्या आवाहनाला ऑस्ट्रेलियानेही समर्थन दिले. याच दरम्यान काँग्रेसचे नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"मोदी सरकारने जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी"; चिदंबरम यांचा खोचक टोला
पी चिदंबरम यांनी मोदींनी परिषदेत केलेल्या भाषणाची प्रशंसा करत सणसणीत टोला लगावला आहे. "G-7 बैठकीमधील पंतप्रधान मोदींचं भाषण प्रेरक आणि विडंबनात्मकही. मोदी सरकारने जगाला दिलेली शिकवण आधी भारतात अंमलात आणावी" अशा शब्दांत चिदंबरम यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच पी चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव अतिथी होते जे आउटरीच परिषदेत थेट उपस्थित नव्हते. कोरोना विरुद्धच्या लढाईचा विचार केला तर भारतातील परिस्थिती वेगळी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात संक्रमित आणि कमीतकमी लसीकरण केलेला देश आहे" असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.