शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:40 PM

कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील २७ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार?राजीव गांधी यांच्यामुळेच अयोध्येत लोकांना रामलल्लाचं दर्शन घडलं - काँग्रेस

भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आजकाल हिंदुत्वाच्या भोवती राजकीय मैदान बनवण्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. सरकार कोसळल्यानंतर कमलनाथ राज्यात सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. ज्यामुळे भाजपा कट्टर हिंदुत्वाचा मुकाबला करू शकतील. कमलनाथ राजकीयदृष्ट्या ही खेळी खेळत आहेत. कारण यात काही नुकसान नाही पण राजकीय फायदा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत हनुमानापासून भगवान श्रीकृष्ण, श्री राम यांचाही पुरेपूर वापर होत आहे.

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचं क्रेडिट वॉर सुरु झालं आहे. मध्य प्रदेश कॉंग्रेसने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७६व्या जयंतीनिमित्त राज्यात एक जाहिरात दिली आहे, या जाहिरातीत दावा केला आहे की, राजीव गांधींनी रामराज्याची संकल्पना मांडली होती. एवढेच नव्हे तर अयोध्येत राम मंदिराचा पायाही राजीव गांधींनी घातला होता आणि त्यांनी रामजन्मभूमीचे कुलूपही उघडले होते. राजीव गांधी हे रामराज्याच्या गतिमान प्रवासाचे कुशल सारथी आहेत असं जाहिरातीत म्हटलं आहे.

राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये दूरदर्शनवर रामायण मालिका सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी रामजन्मभूमीचे कुलूप उघडले आणि भाविकांना रामलल्लाचे दर्शन घडवले.  इतकेच नव्हे तर १९८९ मध्ये त्यांनी रामजन्मभूमीची पायाभरणी करण्याची परवानगीही दिली होती. कमलनाथ म्हणाले होते की, जर कोणी राम मंदिराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. एवढेच नव्हे तर ५ ऑगस्टला अयोध्यातील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी कमलनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी राम दरबार आयोजित केला होता तर काँग्रेस खासदारांनी कार्यालयात दिवे पेटवले होते.

वास्तविक, कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. यासोबतच सत्तेत असताना त्यांनी हिंदू धार्मिक स्थळांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये श्रीलंकेतील सीता मंदिर बांधण्यासाठी निधीची व्यवस्था करण्यापासून ओरछा येथील रामराजाच्या मंदिराच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेने काँग्रेस?

मध्य प्रदेशात २७ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्या 'सॉफ्ट हिंदुत्वा'ला यामाध्यमातून पाहिले जात आहे. मध्य प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार योगेश जोशी यांचे म्हणणे आहे की, सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळून मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे कोणतेही राजकीय नुकसान झाले नाही कारण मुस्लिम मतदारांसमोर दुसरा कोणताही राजकीय पर्याय नाही. २०१८ च्या निवडणुकांमध्ये कमलनाथ या सूत्रानुसार भाजपला हरवण्यात यशस्वी ठरले आहेत. यामुळेच आता पोटनिवडणुकीतही त्यांना हेच धोरण अवलंबण्याची इच्छा आहे.

मध्य प्रदेशात भाजपाने आपल्या पंधरा वर्षांच्या सरकारच्या कारकीर्दीत कॉंग्रेसच्या पारंपारिक व्होट बँकला धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत कमलनाथ यांच्या सॉफ्ट हिंदुत्वामुळे मतांचे जातीय आधारे ध्रुवीकरण होऊ शकले नाही. इंदूर आणि भोपाळसारख्या जातीयदृष्ट्या संवेदनशील शहरांमध्येही कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. सिंहस्थ सारख्या धार्मिक कार्यक्रमांचे भव्य स्वरूपही भाजपाच्या मदतीला आलं नाही. दलितांना भाजपाच्या बाजूने आणण्यासाठी आयोजित सामंजस्य स्नानाचा परिणामही शिवराजांच्या बाजूने दिसला नाही.

२०१८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकले नसले तरी कॉंग्रेसला ११४ जागा जिंकता आल्या आणि भाजपाला १०८ जागा मिळाल्या. मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी समर्थक आमदारांसह कॉंग्रेसविरुध्द बंड करून भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर कमलनाथ यांचे १५ महिन्यांचे सरकार पडले आणि शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा एकदा सत्तेत आली. आता २७ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून अशा परिस्थितीत काँग्रेस हिंदू कार्डचा वापर करुन पाहणार आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशHindutvaहिंदुत्वBJPभाजपा