Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 02:02 PM2021-06-09T14:02:32+5:302021-06-09T14:11:27+5:30
Jitin Prasada joins BJP: उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका; जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते.
माझे घराणे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी (Congress) जोडलेले होते. यामुळे काँग्रेस सोडताना मी बराच काळ विचार केला. गेल्या 8-10 वर्षांपासून मला एकच पक्ष खरा राष्ट्रीय वाटत होता, तो म्हमजे भाजपा. बाकी सारे पक्ष हे स्थानिक झाले आहेत, असे काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटले. (Delhi: Congress leader Jitin Prasada joins BJP in the presence of Union Miniter Piyush Goyal, at the party headquarters.)
देशाच्या भविष्यासाठी, कठीण प्रसंगांत जर कोणता पक्ष आणि नेता उभा असेल तर ती भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जर मी माझ्या लोकांच्या हिताचे रक्षण करू शकत नाही, तर अशा पक्षात राहण्यात काय अर्थ आहे, असे मला काँग्रेसमध्ये वाटत होते. मी तिथे काहीच करू शकत नव्हतो. मला ज्या काँग्रेस नेत्यांनी आशिर्वाद दिला त्यांचा मी आभारी आहे, आता मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे प्रसाद म्हणाले.
जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते.
If there is any political party or a leader standing for the interests of the nation today, given the situation that our country is going through, it is BJP and Prime Minister Narendra Modi: Jitin Prasada, after joining BJP
— ANI (@ANI) June 9, 2021
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh election) तयारीने वेग घेतला आहे. काँग्रेस सुस्त पडलेली असताना भाजपाने मुख्यमंत्र्यांपासून आमदारांच्या कामाचा आढावा आणि मतदारसंघातील वातावरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर आज भाजपाने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे.
कोण आहेत जितिन प्रसाद, ज्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मानला जातोय मोठा धक्का
अनिल बलूनी यांनी एक ट्विट केले....
भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलूनी यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट केले आणि राजकीय चर्चांना उधान आले. त्यांनी आज एक मोठा नेता दुपारी 1 वाजता भाजपा मुख्यालयात पक्षप्रवेश करणार आहे. जितीन प्रसाद यांनी देखील 5 जूनला याचे संकेत दिले होते. योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही.