पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 03:38 PM2021-06-01T15:38:49+5:302021-06-01T15:45:24+5:30

navjot singh sidhu : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे.

congress leader navjot singh sidhu in delhi punjab congress rebel meet panel updates | पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू 

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही - नवज्योत सिंग सिद्धू 

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकटात पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंजाब कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस हाय कमांडने सर्व आमदार, मंत्री आणि राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलवले आहे. या दरम्यान मंगळवारी कॉंग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिल्लीत हायकमांडकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय पॅनलसोबत चर्चा केली. (congress leader navjot singh sidhu in delhi punjab congress rebel meet panel updates) 

नवज्योतसिंग सिद्धू यांनी या बैठकीनंतर सांगितले की, मी हायकमांडने बोलविल्यानंतर याठिकाणी आलो आहे, पंजाबमधील जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी आलो आहे. मी पंजाबचे सत्य आणि हक्काचा आवाज हायककमांडला सांगितला आहे'. याचबरोबर, माझी भूमिका अशी आहे की पंजाबमधील लोकांमध्ये लोकशाही ताकद आहे, त्यांना ती मिळायला हवी. सत्य काय आहे, ते मी संपूर्णपणे सांगून आलो आहे. सत्याचा कधीही पराभव होऊ शकत नाही, आम्हाला पंजाबला जिंकायचे आहे. तसेच, प्रत्येक पंजाबविरोधी शक्तीचा पराभव होईल, असेही नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले.

दरम्यान, कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवे राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचे दिसत आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कसह निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातल्या जात आहे. 

मंगळवारी पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील तीन सदस्यीय पॅनलसमोर त्यांच्या समस्या मांडत आहेत. काँग्रेसच्या किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखडं, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांचा समावेश आहे. ते सर्व दिल्लीत दाखल झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद
नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्ष प्रभारी आशा सिंग यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी मॅडम सिद्धू लोकसभेच्या उमेदावारीसाठी योग्य वाटत नाहीत. दसऱ्या दिवशी झालेल्या ट्रेन दुर्घटनेच्या आधारावर माझे तिकीट कापले गेले, असा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता. तर माझी बायको कधी खोटे बोलत नाही. ती नैतिकतेने मजबूत आहे, असे सांगत नवज्योत सिंग यांनी तिची पाठराखण केली होती.
 

Web Title: congress leader navjot singh sidhu in delhi punjab congress rebel meet panel updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.