शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Rajiv Satav: काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीत आज होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 7:11 AM

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुणे / हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना २३ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात आई माजी मंत्री रजनी सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा, मुलगा पुष्कराज, मुलगी युवराज्ञी व मोठा आप्त परिवार आहे. 

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान, रविवारी रात्री त्यांचे पार्थिव हिंगोलीत आणण्यात आले. या वेळी आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सातव हे ९ मे रोजी कोरोनामधून बरे झाले होते. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाली होती. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले होते. ते धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते, असे असताना  शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली. उपचारादरम्यान रविवारी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

सातव यांचे निधनाचे वृत्त समजताच आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री विश्वजित कदम, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, तसेच माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे यांनी जहांगीर रुग्णालयाकडे धाव घेतली. सातव यांच्या मातोश्री रजनी सातव या शनिवारी रात्रीच पुण्यात आल्या होत्या. 

कोरोनाची लागण झाल्यानंतर, सातव यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्याचा विचार करण्यात आला होता. परंतु, त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना प्रवास झेपणार नाही, असे डॉक्टरांचे मत पडल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातच उपचार करण्यात आले. याही स्थितीमध्ये त्यांनी संघर्ष सुरू ठेवला होता. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वाटत असतानाच त्यांना ‘सायटोमेगॅलोव्हायरस’ या नव्या विषाणूची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावत गेली.  

खासदार सातव हे २० एप्रिल रोजी हिंगोलीत होते. त्यांनी जिल्ह्यात कोरोनाविषयक विविध उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संवाद साधला होता. ऑक्सिजन प्लांट, औषधी, नवीन कोविड सेंटर आदींबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावेळी ते आजारी असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. राजकीय जीवनात पंचायत समिती सदस्य ते खासदार व काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरील चेहरा, असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. कळमनुरीचे आमदार, हिंगोलीचे खासदार व आता राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मतदारसंघातच नव्हे, तर देशातील विविध भागांत त्यांनी संघटनेचे जाळे निर्माण करून आपला चाहता वर्ग निर्माण केला होता.     

सातव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची एकच गर्दीकळमनुरी : खासदार राजीव सातव  यांच्या निधनाची वार्ता कळताच  रविवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. खा. सातव यांचे पार्थिव रात्री नऊच्या दरम्यान कळमनुरी येथे आले. पार्थिव पाहताच अनेक कार्यकर्त्यांचे कंठ दाटून आले. कार्यकर्त्यांनी ‘राजीव सातव अमर रहे, राजीव सातव  जिंदाबाद’, अशा घोषणा दिल्या. अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पार्थिव कळमनुरीत दाखल होताच  कार्यकर्त्यांनी त्यांच्या शववाहिनीवर पुष्पवृष्टी केली. सोमवारी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. 

 

टॅग्स :Rajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेस