मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रस अलर्ट मोडमध्ये आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर पोहोचले. ...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तरदेवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे. निरुपम यांनी शिवसेनेला थेट लक्ष्य केलं आहे. 'शिवसेना ज्यांच्यासोबत असते, त्यांच्यासोबत ती असते आणि नसतेही. अशा प्रकारे ते उपद्रव करतात. काँग्रेसनं सत्तेसाठी आपला विचार, व्यवहार सोडला आणि शिवसेनेसोबत आघाडी केली. याबद्दल मी आधीपासूनच पक्षाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्यांच्यासोबत नातं निभावताय, ते नातं निभावणारे नाहीत. ते कधीही विश्वासघात करू शकतात, हे मी वारंवार सांगितलं आहे,' असं निरुपम यांनी म्हटलं. संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...संजय राऊतांच्या भेटीबद्दल काय म्हणाले फडणवीस?'शिवसेना नेते संजय राऊत यांना सामनासाठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. त्यावर मी जरूर मुलाखत देईन असं त्यांना म्हटलं. पण माझ्या काही अटी, शर्ती आहेत. मुलाखत घेताना तिथे माझाही कॅमेरा असेल, अशा माझ्या काही अटी, शर्टी आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकदा भेटून बोलू असं ठरलं होतं. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो घेतो,' असं फडणवीस म्हणाले.मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंपभाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही, हे सरकार स्वत:च्या कृतींमुळेच कोसळेल, या विधानांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल भाजपची कुठलीही चर्चा नाही. तशी चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही करत आहोत. हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. त्यावेळी काय करायचं ते तेव्हा बघू. सरकार स्थापनेची आम्हाला कुठलीही घाई नाही,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस-राऊत भेटीनंतर राष्ट्रवादी अलर्टफडणवीस आणि राऊत भेटीमुळे राज्यात शिवसेना-भाजपा पुन्हा जवळ येणार का? अशी चर्चा सुरु झाली. या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसही अलर्ट झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत, या दोघांमध्ये राज्यातील प्रश्न आणि सध्या सुरु असणारी परिस्थिती यावर चर्चा होणार आहे.देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात झाली होती २ तास गुप्त बैठकसांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये शनिवारी दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे हा प्रश्न आहे. मात्र फडणवीस राऊत बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.