देशातील लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने (Narendra Modi) मंगळवारी मोठा निर्णय घेतला. ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेनं मान्यता दिली आहे त्या सर्व लसींना भारतानंही मंजुरी दिली आहे. सरकारनं आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि WHO शी संबंधित आहेत. दरम्यान यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सरकारला टोला लगवाला आहे. "सरकारनं विरोधी पक्षांच्या सूचना टीका आहेत असं समजून नाकारू नये ही समृद्ध लोकशाहीची परंपरा आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी परदेशी फार्मा कंपन्यांच्या लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता. काही मंत्र्यांनी त्यानंतर त्यांच्यावर टीका केली. पण चार दिवसांनी सरकारनं राहुल गांधींचाच सल्ला मानला," असं म्हणत संजय निरुपम यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.
Coronavirus : "राहुल गांधींनी परदेशी लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता, त्यावेळी टीका केली; पण आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 15:51 IST
Coronavirus Vaccinations : काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारवर निशाणा. ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेनं मान्यता दिली आहे त्या सर्व लसींना भारतानंही मंजुरी दिली आहे.
Coronavirus : राहुल गांधींनी परदेशी लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता, त्यावेळी टीका केली; पण आता...
ठळक मुद्देजगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेनं मान्यता दिली आहे त्या सर्व लसींना भारतानंही दिली मंजुरीयापूर्वी केंद्रानं रशियाच्या स्पुतनिक V लसीच्या आपात्कालिन वापरास दिली मंजुरी