मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल विधानसभेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर, औरंगाबादचं नामांतर, राम मंदिर यांच्यासारख्या अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केलं. बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला गेल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना खडे बोल सुनावले आहेत.उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं- सुधीर मुनगंटीवार'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी मशिदीच्या विध्वंसाबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काँग्रेस आणि एनसीपीचे मंत्री आणि आमदार त्यांच्या भाषणाचा आनंद घेत होते. हा हा कोणता किमान समान कार्यक्रम? ओवैसींच्या विषारी रोपट्याच्या वाढीला यातूनच खतपाणी मिळत नाही की का?,' असे प्रश्न निरुपम यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 11:43 IST